Advertisement

मेट्रोच्या कामामुळे प.रेल्वेच्या मुख्यालयाला हादरे, स्ट्रक्चरल आॅडिटचे आदेश

भुयारी रेल्वे मार्गासाठी भूमिगत स्फोट घडवण्यात येत असल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या १२० जुन्या मुख्यालयाला हादरे बसत आहेत.

मेट्रोच्या कामामुळे प.रेल्वेच्या मुख्यालयाला हादरे, स्ट्रक्चरल आॅडिटचे आदेश
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडला स्थगिती दिली असली, तरी मेट्रो ३ प्रकल्पाची इतर कामे जोरात सुरू आहेत. मुंबईतल्या या पहिल्यावहिल्या भुयारी रेल्वे मार्गासाठी भूमिगत स्फोट घडवण्यात येत असल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या १२० जुन्या मुख्यालयाला हादरे बसत आहेत. परिणामी या इमारतीचं स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

हेही वाचा- आरेमधील मेट्रो कारशेडसह प्रस्तावित प्रकल्पांनाही पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३.५ किमी मार्गाच्या भुयारी मेट्रो मार्गावर एकूण २७ स्थानकं आहेत. या प्रकल्पासाठी जागोजागी भूमिगत कामे सुरू आहेत. त्यानुसार चर्चगेटच्या ओव्हल मैदान परिसरात भूमिगत स्फोट घडवून आणले जात आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील इमारतींना सौम्य हादरे बसत आहेत. त्यात चर्चगेटच्या १२० वर्षे जुन्या हेरिटेज इमारतीचाही समावेश आहे.

असेच हादरे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या वर्ल्ड हेरिटेज इमारतीलाही बसत असल्याचं येथील कर्मचारी सांगतात. गेल्या आठवडाभरापासून दिवसाला ७ ते ८ वेळेस हलक्या स्वरूपाचे हादरे बसत आहेत. हे हादरे दुसऱ्या मजल्यापर्यंत जाणवत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.    

हेही वाचा- रेल्वे स्थानकातील 'इतक्या' फेरीवाल्यांवर कारवाई

यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं की, मेट्रोच्या कामांमुळे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय असलेल्या इमारतीचं काही नुकसान तर झालं नाही ना? याची खातरजमा करून घेण्यासाठी स्ट्रक्चरल आॅडिटचे आदेश देण्यात आले आहेत. मेट्रो ३ प्रकल्प राबवणाऱ्या ‘एमएमआरसीए’कडूनही आम्हाला दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार आम्ही काळजी घेत आहोत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा