Advertisement

शिक्षकांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी नाहीच

लोकल ट्रेनने (local train) प्रवास करू देण्याची शिक्षकांनी (teachers) मागितलेली परवानगी राज्य सरकारनं फेटाळून लावली आहे.

शिक्षकांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी नाहीच
SHARES

लोकल ट्रेनने (local train) प्रवास करू देण्याची शिक्षकांनी (teachers) मागितलेली परवानगी राज्य सरकारनं फेटाळून लावली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचं अंतर्गत मुल्यमापन करण्यासाठी शिक्षकांना शाळेत जावं लागत आहे. त्यामुळे मुंबईत शिक्षकांकडून लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची मागणी केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत दहावीच्या शिक्षकांनी आंदोलन देखील केलं होतं.

मुंबईच्या शाळांमध्ये शिकवणारे अनेक शिक्षक वसई, विरार, पालघर, कल्याण, पनवेल या ठिकाणाहून येतात. लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असल्याने शिक्षकांना सुद्धा त्यामध्ये परवानगी मिळावी जेणेकरुन निकालाचे काम तातडीने पूर्ण करता येईल अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.  मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांना लोकलने प्रवास अद्याप तरी करता येणार नाही.

मुंबईतील शिक्षकांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दोन दिवसापूर्वी कायदेभंग आंदोलन केलं होतं.  शिक्षकांना दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या कामासाठी शाळेत जाण्यासाठी लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्या, अन्यथा २० दिवसात शाळांनी निकाल तयार करण्याचा कालावधी वाढवून द्या, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीच्या आधारावर संबंधित जिल्हा किंवा महानगर पालिकेचा कोणत्या गटात समावेश होईल, हे ठरवलं जात आहे. मात्र, मागील आठवड्यात मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी कमी होऊन देखील मुंबईत तिसऱ्या गटाचेच निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मुबईकरांना निर्बंधांमधून सूट मिळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

 


हेही वाचा -

शाब्बास धारावीकर! सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णसंख्या

पेट्रोल पुन्हा महागलं; मुंबई-पुण्यात प्रति लिटर १०२ पार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा