Advertisement

तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना १०० रुपये नुकसान भरपाई

अहमदाबाद-मुंबई खासगी तेजस एक्स्प्रेसला पहिल्याच आठवड्यात 'लेटमार्क' (letmark) लागला.

तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना १०० रुपये नुकसान भरपाई
SHARES

देशातील दुसरी काॅर्पोरेट ट्रेन तेजस एक्स्प्रेसला (Tejas Express) गुरूवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन अहमदाबाद ते मुंबई (Ahmdabad to mumbai) या मार्गावर धावत आहे. परंतु, या अहमदाबाद-मुंबई खासगी तेजस एक्स्प्रेसला पहिल्याच आठवड्यात 'लेटमार्क' (letmark) लागला आहे. मिरा रोड-भाईंदर दरम्यान ओव्हरहेड वायरमधील (OHE) वीजपुरवठा तांत्रिक (Technical Issue) कारणास्तव खंडित झाला. त्यामुळे तेजस एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल (Mumbai Central) स्थानकात तब्बल १ तास २५ मिनिटे उशिरानं पोहचली. त्यामुळं या एक्स्प्रेसमधील प्रत्येक प्रवाशाला १०० रुपये विलंब भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.

अहमदाबाद येथून सकाळी ६.४० वाजता तेजस एक्स्प्रेस (Tejas Express) मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. मुंबई सेंट्रल स्थानकात ही गाडी दुपारी १.१० वाजता पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु, ही गाडी २.३५ वाजता पोहोचली. दहिसर-मिरा रोड-भाईंदर स्थानका (Dahisar-Mira road-Bhainder Station) दरम्यान ओएचई (ओव्हर हेड) वायरमधील वीजपुरवठा दुपारी १२.१५ सुमारास खंडित झाल्यामुळं अप जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

हेही वाचा - Video: अहमदाबाद ते मुंबई धावणार ‘तेजस एक्स्प्रेस’, बघा, आतून आहे ‘इतकी’ खास

तासाभरानंतर म्हणजेच १.३५ वाजताच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या बिघाडामुळं लोकलच्या ८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचबरोबर मुंबईकडं येणाऱ्या एक्स्प्रेसही खोंळबल्या होत्या. तेजस एक्स्प्रेस १९ जानेवारीपासून अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद (Ahmdabad-Mumbai-Ahmdabad) मार्गावर सुरू झाली.

हेही वाचा - ‘या’ ज्येष्ठ शिवसैनिकाने दिला मनसेला आशीर्वाद, तुम्हीच ऐका, काय म्हणाले…

या तेजस एक्स्प्रेसमध्ये प्री-लोडेड वायफाय (Wi-fi), आरामदायी आसन अशा सुविधा आहेत. प्रवासी तक्रारी निवारण्यासाठी एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सहाय्यकांची नेमणूकही करण्यात आली आहे. त्याचबोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही (CCTC) आणि सुरक्षारक्षकांची गस्त ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी तेजस एक्सप्रेसला (Tejas Express) अंधेरी स्थानकात (Andheri Station) २ मिनिटांचा तात्पुरता थांबा देण्यात आला होता.

एक्स्प्रेसला विलंब झाल्यानं एकूण ६३० प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. विलंब झाल्याचा दावा करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला प्रत्येकी १०० रुपये देण्यात येणार आहेत, असे आयआरसीटीसीकडून (IRCTC) सांगण्यात आलं आहे. त्यानुसार नुकसान भरपाईचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये (Bank Account) जमा होणार आहेत.



हेही वाचा -

तिसऱ्यांदा ‘सायबर महाराष्ट्र’च्या विभागणीचा प्रस्ताव गृहविभागाने फेटाळला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचं अनावरण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा