Advertisement

‘या’ ज्येष्ठ शिवसैनिकाने दिला मनसेला आशीर्वाद, तुम्हीच ऐका, काय म्हणाले…

राज यांच्या भूमिकेला शिवसैनिकांचाही पाठिंबा मिळत असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. याचा हवाला देताना मनसेने एका ज्येष्ठ शिवसैनिकाची आॅडिओ क्लिपच सोशल मीडियावर टाकली आहे.

‘या’ ज्येष्ठ शिवसैनिकाने दिला मनसेला आशीर्वाद, तुम्हीच ऐका, काय म्हणाले…
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी गुरूवारी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. यातून मनसे हिंदुत्वाच्या (hindutva) दिशेने जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असले तरी राज ठाकरे आपल्या भाषणातून नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोबतच राज यांच्या भूमिकेला शिवसैनिकांचाही पाठिंबा मिळत असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. याचा हवाला देताना मनसेने एका ज्येष्ठ शिवसैनिकाची (shiv sainik) आॅडिओ क्लिपच (audio clip) सोशल मीडियावर टाकली आहे.  

मनसेचं पहिलं महाअधिवेशन गोरेगावच्या नेस्को (nesco goregaon) मैदानात सुरू आहे. या अधिवेशनात (seminar) मनसेने आपला जुना  निळा, भगवा आणि हिरव्या रंगाचा झेंडा बदलून नवीन भगव्या रंगाचा झेंडा (saffron flag) आणला आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड इ. संघटनांनी विरोध करूनही मनसेने या झेंड्यात शिवरायांची राजमुद्रा (rajmudra) वापरली आहे. महाअधिवेशनाच्या निमित्ताने मनसेचे विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा या आशयाचे पोस्टर्स सर्वत्र लावले आहेत. यावरून मनसे हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचं स्पष्ट होत आहे. आता मनसैनिकांना प्रतिक्षा आहे ती केवळ राज ठाकरे यांच्या भाषणाची. मनसेच्या या  बदलेल्या धोरणाला ज्येष्ठ शिवसैनिकानेही (shiv sena) पाठिंबा दर्शवला आहे.

हेही वाचा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचं अनावरण

मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर (twitter) यासंदर्भातील माहिती दिली आहे. मनसे नेत्या रुपाली पाटील यांना एका ज्येष्ठ शिवसैनिकांनी फोन करून मनसेच्या नव्या भूमिकेचं कौतुक केलं. या ज्येष्ठ शिवसैनिकाने नेमकं काय म्हटलं, याची आॅडियो क्लिपच मनसेने आपल्या ट्विटर हँडलवर टाकली आहे. याबद्दल मनसेने स्पष्टीकरण दिलं आहे की, खरं तर दोन व्यक्तिंमधील खाजगी संभाषण हे जाहीर करू नये हा संकेत असतो; पण त्या संभाषणाला जर आशीर्वादाची, सदिच्छांची किनार असेल तर कधी संकेतभंग करायला देखील हरकत नाही. हे ज्येष्ठ शिवसैनिक अनामिक आहेत, पण आम्हाला ते वंदनीय आहेत. असं मनसेनं लिहिलं आहे.  

यामध्ये संवादामध्ये हे ज्येष्ठ शिवसैनिक म्हणतात की, मी ६७ मधील बाळासाहेबांचा सैनिक आहे. पूर्वी आम्ही मोरारजींची गाडी अडवायला जायचो. आता ७० वर्षांचा झालो आहे, त्यामुळे पूर्वीसारखी अंगात शक्ती राहिलेली नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी ठाम होतो. पण आताचे लोकं विचारांशी ठाम नाहीत. मनसेने असं आंदोलन करावं की आम्हाला या वयातही रस्त्यावर उतरुन संघर्ष करावंसं वाटलं पाहिजे.

हेही वाचा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन

महाअधिवेशनासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. संध्याकाळी ६ च्या सुमारास राज ठाकरेंचं भाषण होणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा