Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याची मागणी

महापालिकेने नुकत्याच घोषित केलेल्या कोरोना हॉटस्पॉट यादीत एसटी महामंडळाचे परळ आणि मुंबई सेंट्रल हे सर्वात महत्त्वाचे आगार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याची मागणी
SHARES

महापालिकेने नुकत्याच घोषित केलेल्या कोरोना हॉटस्पॉट यादीत एसटी महामंडळाचे परळ आणि मुंबई सेंट्रल हे सर्वात महत्त्वाचे आगार आहेत. एसटी महामंडळाचे हे सर्वात मोठे आगार आहेत. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून एसटी चालक-वाहकांसाठी रोज थर्मल स्कॅनिंग आणि आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्यावतीनं करण्यात आली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई दिवसेंदिवस कोरोना आजाराचे केंद्र बनत आहे. राज्यात १,१३५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर एकट्या मुंबईत ७१४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत जिथे जिथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. तो परिसर प्रशासनानं सील केला आहे.

मुंबई सेंट्रल डेपोजवळील वोक्हार्ट रुगणालयाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अत्यावश्यक सेवेत प्रवासी वाहतुकीची जबाबदारी असलेल्या चालक-वाहक रोज शेकडो प्रवाशांच्या संपर्कात जातात. परळ आणि मुंबई सेंट्रल डेपो परिसर करोना हॉटस्पॉट असल्याचं महापालिकेनं घोषित केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे या आगारांमधून चालक-वाहक बस फेरी सुरू करण्याआधी त्यांचा आरोग्य तपासणीची स्वतंत्र सुविधा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे.



हेही वाचा -

१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा