मुंबई (mumbai) आणि अहमदाबाद दरम्यान 508 किलोमीटरचा भारतात अग्रगण्य बुलेट ट्रेन (Bullet Train) मार्ग बांधला जात आहे. SMART (स्टेशन एरिया डेव्हलपमेंट) उपक्रमांतर्गत विकासासाठी बुलेट ट्रेन मार्गातील 12 पैकी चार स्थानकांची निवड केली आहे. यात ठाणे (thane), विरार (virar), सुरत आणि साबरमती स्थानकांचा समावेश आहे.
ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (TOD) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नाविन्यपूर्ण पध्दतीचा उद्देश प्रवाशांसाठी सोयी-सुविधा सुधारणे, गर्दी कमी करणे आणि या ट्रान्झिट हब्सभोवती व्यावसायिक वाढीस चालना देणे आहे.
SMART उपक्रमात पाच मुख्य उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित आहे: योग्यता सुधारणे, पर्यटनासोबतच प्रवासाला चालना मिळणार, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, महसूल निर्माण करणे आणि शाश्वत शहरी विकासास समर्थन देणे. निवडलेल्या चार स्थानकांपैकी प्रत्येक स्थानकाच्या परिसरापासून 800 मीटर अंतरापर्यंत विकास होणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक स्थानकाभोवती तात्काळ 200-मीटर त्रिज्येवर लक्ष केंद्रित केले जाईल. पिक-अप, ड्रॉप-ऑफ, पार्किंग आणि प्रवाशांच्या अनुकुलतेसाठी पायाभूत सुविधांची स्थापना केली जाईल.
एक कार्यक्षम इकोसिस्टम तयार करण्यासाठी SMART मेट्रो लाईन, बस सेवा, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षासह अनेक परिवहन पर्यायांसह स्थानकांना जाेडेल. या मल्टीमॉडल सेटअपमुळे केवळ प्रवासाचा कालावधी कमी होणार नाही तर सार्वजनिक वाहतूक वापरास प्रोत्साहन मिळेल.
आसपासच्या शहरी भागातील गर्दी कमी होईल. तसेच स्थानिक पायाभूत सुविधांवरील ताण कमी केला जाईल आणि प्रवाशांना सुधारित कनेक्टिव्हिटीचा फायदा होईल.
हेही वाचा