Advertisement

ठाणे स्टेशनवर सर्वात जास्त गर्दी, तर कुर्ला दुसऱ्या स्थानावर

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी ठाणे रेल्वे स्थानक सर्वात गर्दीचं स्टेशन ठरलं आहे. मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्टेशन तीन वेळा सर्वाधिक गर्दीचं स्टेशन ठरलं होतं. पण, आता ती जागा ठाणे स्टेशननं घेतली आहे.

ठाणे स्टेशनवर सर्वात जास्त गर्दी, तर कुर्ला दुसऱ्या स्थानावर
SHARES

पहिला म्हणतो, 'काय गर्दी असते डोंबिवली स्टेशनवर', तर दुसरा म्हणतो 'डोंबिवली सोड, कल्याणला किती गर्दी असते', त्यावर तिसऱ्याचं उत्तर असतं, 'सगळ्यात जास्त गर्दी घाटकोपरला असते'! ही अशी चर्चा तुम्हाला मुबंईत लोकलने प्रवास करताना अगदी हमखास ऐकायला मिळत असते. पण आता हा संभ्रम प्रवाशांमध्ये असणार नाही. आता मध्य रेल्वेनेच सर्वाधिक गर्दीचं स्टेशन जाहीर केलं आहे. आणि ते स्टेशन आहे ठाणे!


डोंबिवलीची गर्दी घटली!

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी ठाणे रेल्वे स्थानक सर्वात गर्दीचं स्टेशन ठरलं आहे. मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्टेशन तीन वेळा सर्वाधिक गर्दीचं स्टेशन ठरलं होतं. पण, आता ती जागा ठाणे स्टेशननं घेतली आहे. दरम्यान, सर्वाधिक गर्दीच्या स्टेशनमध्ये ठाण्यापाठोपाठ कुर्ला, कल्याण, घाटकोपर आणि सीएसएमटी ही पाच स्थानकं असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मध्य रेल्वेवर गर्दीच्या बाबतीत जशी ठाणे, कुर्ला आणि कल्याण ही स्थानकं पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत, तशीच रेल्वेला उत्पन्न मिळवून देण्यातही हीच स्थानकं आघाडीवर आहेत.


ठाणे स्टेशनवर मध्य रेल्वेची सर्वाधिक कमाई

ट्रान्स हार्बर या मार्गामुळे ठाणे सर्वाधिक गर्दीचं स्थानक ठरलं आहे. २൦१७ मध्ये ठाणे स्थानकावर ७८ हजार ७६२ तिकिटांची विक्री झाली असून त्यामधून रेल्वेला २२ लाख ५२ हजार ४७२ रुपये उत्पन्न मिळालं आहे. तर, २ लाख ५८ हजार ३६३ प्रवाशांनी ठाणे स्थानकातून प्रवास केल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. पण, मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गजबजलेली स्थानकं म्हणून ख्याती असणाऱ्या सीएसएमटी स्थानकातील दर दिवशीच्या प्रवासी संख्येत मात्र कमालीची घट झाली आहे.


स्थानक
तिकिटे
प्रवाशांची संख्या
उत्पन्न (रुपये)
ठाणे
७८७६२
२५८३६३
२२ लाख ५२ हजार ४७२
कुर्ला
५८३६६
१५७६४१
१० लाख ६७ हजार १९७
कल्याण
५१७११
२०८८०१
३ लाख ७६ हजार ६९७
घाटकोपर
४९२२८
१९०४५८
११ लाख ४८ हजार ४५५
सीएसएमटी
४०८२७
१४४५८२
३ लाख ९७ हजार ७८४



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा