Advertisement

ठाणे स्थानकावर बनणार डिजिटल संग्रहालय

डिजिटल संग्रहालयात ठाणे स्थानकाचे जुने फोटो ठेवण्यात येणार अाहेत. याशिवाय स्थानकाबाबत एेतिहासिक माहितीही दाखवण्यात येणार अाहे.

ठाणे स्थानकावर बनणार डिजिटल संग्रहालय
SHARES

ठाणे रेल्वे स्थानकाला यंदा १६५ वर्ष पूर्ण होत अाहेत. त्यानिमित्ताने ठाणे स्थानकावर डिजिटल संग्रहालय बनवण्यात येणार अाहे. या संग्रहालयात ठाणे स्थानकाचे जुने फोटो ठेवण्यात येणार अाहेत. याशिवाय स्थानकाबाबत एेतिहासिक माहितीही दाखवण्यात येणार अाहे. ठाणे स्थानकासह सीएसटीएम, लोणावाला, पुणे अाणि दौंड स्थानकावरही डिजिटल संग्रहालय सुरू करण्यात येणार अाहे.


मागणी फेटाळली

ठाणे रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी म्हटलं की, पहिली भारतीय रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर - ठाणे या मार्गावर चालवण्यात अाली. ठाणे स्थानकाला अाता १६५ वर्ष पूर्ण होत अाहेत. रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला ठाणे स्थानकावर डिजिटल संग्रहालय सुरू करण्याचे निर्देश दिले अाहेत. दरम्यान, ठाणे रेल्वे प्रवासी संघाने ठाणे स्थानकावर सर्वात जुने रेल्वे इंजिन ठेवण्याची मागणी केली अाहे. ही मागणी रेल्वेने फेटाळल्याचं देशमुख यांनी सांगितलं.


डिजिटल संग्रहालयाचा अाकार अाणि ठिकाण अद्याप निश्चित केलेले नाही. या संग्रहालयात स्थानकाचे जुने फोटो, वाफेचे इंजिन, भारतीय रेल्वे अाणि स्थानकांबद्दल माहिती दिली जाईल.
- ए.के.जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई



हेही वाचा -

डिसेंबरपासून धावणार गोरेगाव-पनवेल लोकल

मुंबई एअरपोर्टच्या नावात सुधारणा, 'महाराज' उपाधीचा समावेश




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा