Advertisement

लोकल स्टंटचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल


लोकल स्टंटचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
SHARES

धावत्या लोकलमधील स्टंटचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरूण लोकलच्या दरवाजाला लटकून स्टंट करताना दिसत आहे. ही लोकल हार्बर मार्गावर शनिवारी सकाळच्या सुमारास पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जात होती.


सहप्रवाशांचा ओरडा

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुण लोकलच्या दरवाजाला लटकून स्टंट करताना दिसत आहे. मात्र काही वेळानंतर मागच्या डब्यातील काही व्यक्तींनी ओरडल्यावर हा तरूण स्टंट करायचं थांबवतो. त्याचप्रमाणं कोणतरी आपला व्हिडिओ काढत आहे, हे समजताच तरूण लोकलच्या दरवाजात उभा राहतो.


तरूणी आली गोत्यात

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या लोकल स्टंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये लोकलच्या दरवाजात उभी असलेली एक तरूणी पाय घसरून पडताना थोडक्यात बचावली होती. सध्या पोलिसांनी तिच्यावर रेल्वे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली अाहे.



हेही वाचा-

मध्य रेल्वे मार्गावरील लोकलवर दगडफेक, तरुणी गंभीर जखमी

'त्या' स्टंटबाज तरूणीवर गुन्हा दाखल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा