Advertisement

Mumbai Local News: 'या' एसी सेवा आज नॉन-एसी ट्रेन म्हणून धावणार आहेत

12 ऑक्टोबर 2022 या एक दिवसासाठीच हा निर्णय लागू असेल.

Mumbai Local News:  'या' एसी सेवा आज नॉन-एसी ट्रेन म्हणून धावणार आहेत
(File Image)
SHARES

पश्चिम रेल्वेने (WR) जाहीर केले आहे की मुंबई उपनगरीय नेटवर्कवरील अनेक वातानुकूलित (AC) ट्रेन आज, 12 ऑक्टोबर 2022 रोजी नॉन-AC सेवा म्हणून धावतील.

तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेट ते विरार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील एसी रेल्वे सेवांवर दिवसभर परिणाम झाला आहे. रेल्वेने काही दिवसांपूर्वीच एसी लोकल गाड्यांची घोषणा केली होती. यामुळे 1 ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू झाले.

ट्रेनच्या वेळेत या तत्काळ बदलामुळे अनेक प्रवाशांनी त्यांच्या वेळापत्रकात व्यत्यय आल्याच्या तक्रारी केल्या आहेत.



त्याचप्रमाणे, WR ने हे विधान प्रसिद्ध केल्यानंतर लगेचच, नेटिझन्सनी रेल्वे आणि अधिकाऱ्यांवर प्रवाशांना चांगली सेवा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. तर काहींनी सर्व लोकल नियमितपणे नॉन-एसी म्हणून ठेवण्याची सूचना केली.






हेही वाचा

बेस्टची ‘दिवाळी सुपर सेव्हर ऑफर’, 9 रुपयांत 5 फेऱ्यांचा लाभ!

पश्चिम रेल्वेनेकडून गुड न्यूज! लोकलमध्ये महिलांचे डबे वाढवले

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा