Advertisement

मुंबई-अहमदाबाद प्रवास महागला, राष्ट्रीय महामार्ग-८ वरील टोल वाढला

राष्ट्रीय महामार्ग-८ वरील दहिसर ते सूरतदरम्यान असलेल्या ४ टोलनाक्यांवरील टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ ५ ते १५ रुपयांनी झाली असून नवी दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद प्रवास महागला, राष्ट्रीय महामार्ग-८ वरील टोल वाढला
SHARES

मुंबईवरून सूरत-अहमदाबादला जायचं असेल, तर तुम्हाला टोलसाठी जादा रक्कम मोजावी लागेल. कारण राष्ट्रीय महामार्ग-८ वरील दहिसर ते सूरतदरम्यान असलेल्या ४ टोलनाक्यांवरील टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ ५ ते १५ रुपयांनी झाली असून नवी दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळं आता मुंबईकरांचा मुंबई-सूरत-अहमदाबाद प्रवास महागणार आहे.


कुठल्या टोलनाक्यांचा समावेश?

राष्ट्रीय महामार्ग-८ वरील दहिसर ते सूरतदरम्यानच्या चारोटी, खाणीवडे, भागवडा आणि भरोच हे ४ टोलनाके आहेत. या चारही टोलनाक्यांवरील टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय 'नॅशनल हायवे अॅथाॅरिटी आॅफ इंडिया' अर्थात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं घेतला आहे.

आयआरबी सूरत-दहिसर टोलवे लिमिटेडकडे या चारही टोलनाक्यांवरील टोलवसुलीचं कंत्राट आहे. या चार टोलनाक्यांपैकी २ टोलनाके, चरोटी आणि खाणीवडे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात येतात. या टोलनाक्यांवरील टोलच्या दरांमध्ये ५ रुपयांपासून १५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.


पुढे जाणाऱ्यांनाही फटका

मुंबई-अहमदाबादवरून पुढे जयपूर आणि दिल्लीला जाणाऱ्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. सिंगल ट्रिप, रिटर्न ट्रिप, मासिक पास, एका दिवसातील मल्टिपल जर्नी या सर्वच प्रकाराच्या प्रवासाच्या टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. चार टोलनाक्यांवर वाढ झाल्यानं याचा मोठा फटका प्रवाशी-वाहनचालकांना बसणार असल्याचं म्हटलं जात आहे.



कशासाठी किती रुपये?

चरोटी टोलनाक्यावर सध्या कार, जीप, व्हॅनला सिंगल ट्रीपसाठी ६० रुपये मोजावे लागतात. यात कोणतीही वाढ करण्यात आली नसून ६० रुपयेच राहणार आहेत. मात्र हलक्या वाहनां (मिनीबस, मालवाहतूक करणारी वाहनं) यांच्यासाठी सध्या २१० रुपये इतका टोल आहे.

१ सप्टेंबरपासून हा टोल ५ रुपयांनी वाढून २१५ इतका होणार आहे. तर अतिअवजड वाहनांसाठी सध्या ३३५ रुपये असा टोल असून पुढे तो ३४५ रुपये इतका होणार आहे. ट्रक आणि बसमधील टोलमध्येही वाढ झाली असून सध्या जिथं २१५ रुपये मोजावे लागतात तिथे यापुढं अधिक रुपये मोजावे लागणार आहेत.


१ सप्टेंबरपासून दरवाढ

खाणीवडे टोलनाक्यावर कार, जीप, व्हॅनला सिंगल ट्रीपसाठी ६५ रुपये मोजावे लागत असून यापुढं ७० रुपये मोजावे लागतील. तर मासिक पाससाठी १९७५ रुपयांएेवजी २०३० रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच मासिक पासमध्ये ७५ रुपयांची वाढ झाली आहे. हलक्या वाहनांसाठी ११५ रुपयांएेवजी १२० रुपये मोजावे लागतील. तर रिटर्न ट्रिपसाठी १७५ रुपयांएेवजी १८० रुपये आणि मासिक पाससाठी ३४५५ एेवजी ३५५५ रुपये मोजावे लागणार आहेत.

ट्रक-बससाठी २३० एेवजी २३५, रिटर्न ट्रीपसाठी ३४५ एेवजी ३५५ तर मासिक पाससाठी ६९१० एेवजी ७११० रुपये मोजावे लागणार आहेत. अवजड वाहनांसाठी ३७० एेवजी ३८० रुपये मोजावे लागणार आहेत. भरोच आणि भागवडा टोलनाक्यांवरील सिंगल ट्रिपच्या दरात ५ ते १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार असल्याचं नॅशनल हायवे अॅथाॅरिटी आॅफ इंडियानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे.



हेही वाचा-

मुंबई ते दिल्ली फक्त १२ तासांमध्ये!

मुंबई-नागपूर अंतर होणार ६ तासांचं, हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा