Advertisement

३ आणि ४ एप्रिलला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जाम, 'या' मार्गाचा करा वापर

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या (WH) दोन्ही बाजू बंद ठेवण्यात येणार आहे.

३ आणि ४ एप्रिलला वेस्टर्न एक्स्प्रेस  हायवे जाम, 'या' मार्गाचा करा वापर
SHARES

बोरिवली (पूर्व), मगाठाणे मेट्रो स्टेशन जवळ फूट ओव्हरब्रिजचे बांधकाम ३ एप्रिल रोजी हाती घेण्यात येणार आहे. हे लक्षात घेऊन वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या (WH) दोन्ही बाजू बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक अधिकाऱ्यांनुसार, ३ एप्रिल रोजी रात्री ११ ते ४ एप्रिल सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

मुंबईहून वसई-विरारकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतूक अधिकाऱ्यांनी शिफारस केली आहे की, जेव्हीएलआर जंक्शनकडून उजवीकडे वळण घ्या. त्यानंतर पवई / विक्रोळीकडे जाणाऱ्या रोडवरून पूर्व द्रुतगती महामार्गावर जा. तिकडून ठाणे आणि अखेर घोडबंदर रस्त्याचा वापर करून वसई-विरार गाठा.

वसई-विरारकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी वाहतूक पोलिसांनी शिफारस केलेला मार्ग

  • आकुर्ली मेट्रोजवळील कांदिवली स्लिप रोडवर डावीकडे वळा
  • कांदिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने जा
  • ठाकूर हाऊस इथं डावीकडे वळा
  • राजगुरू उड्डाणपुलावरुन एसव्ही रोडला जा
  • पोइसर आगाराच्या दिशेनं जा
  • सुमेर नगर जंक्शन इथं उजवीकडे वळा
  • WEH कडे डावीकडे वळा

दरम्यान, वसई-विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना फाऊंटन हॉटेल वरून डावीकडे वळावे लागेल. घोडबंदर रोडवर पुढे जावे लागेल. पूर्वेकडील द्रुतगती महामार्गावर जावे लागेल आणि शेवटी आनंद नगर चौकी मार्गे जावे लागेल.

या दिशेनं जाणाऱ्या हलक्या वाहनांना पावसकर उड्डाणपुलाजवळ डावीकडे वळावे, वायरलेस कंपाऊंड येथून उजवीकडे जाणे, लिंक रोडवर जाणे, मिथ चौकी जंक्शन येथे डावीकडे वळावे, मालाड सबवेकडे एसव्ही रोडवर जाणे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत जाणे आवश्यक आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा