बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार ३ हजार भाड्याच्या बस?

सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत गुरुवारी बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबई महापालिका आयुक्तांनी ६ हजार बसेस भाड्यानं घेण्याचा पर्याय मांडला.

SHARE

मागील अनेक महिने आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी दरमहा १०० कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय महापालिका गटनेते आणि महापालिता आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीत  घेण्यात आला. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत गुरुवारी बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबई महापालिका आयुक्तांनी ३ हजार बस भाड्यानं घेण्याचा पर्याय मांडला. त्यामुळं येत्या काळात बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाड्याच्या बस येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


५५० कोटींची बचत

गुरुवारी झालेल्या बैठकीत आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ३ हजार बस भाड्यानं घेण्याचा पर्याय मांडला. सद्यस्थितीत बेस्टच्या ताफ्यात ३,२०० बस आहेत. बेस्टसाठी महापालिकेनं कृती आराखडा दिला आहे. यामधून ५५० कोटी रुपयांची बचत होणार असल्याचा दावा महापालिकेनं यावेळी केला. महापालिकेच्या या आरखड्याची अंमलबजावणी करण्यास बेस्टनं सुरूवात केली असून त्याला यश मिळत असल्याची माहिती समजतं आहे.

'असा' आहे पालिकेचा कृती आराखडा

अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवणं, कर्मचाऱ्यांना घर खरेदीसाठी सबसिडी देणं, कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणं, कार्यभत्ता, प्रवासभत्ता खंडित करणं, पाल्यांना वह्या-पुस्तकासाठीचे सहाय्य बंद करणं, शिष्यवृत्ती योजना खंडित करणं असा कृती आराखडा महापालिकेनं बेस्टसाठी बनवला आहे.हेही वाचा -

'थकीत बिल द्या, अन्यथा वीजपुरवठा बंद करू', टाटा पॉवर कंपनीचा बेस्टला इशारा

मुंबई महापालिकेकडून बेस्टला मिळणार दरमहा १०० कोटीसंबंधित विषय
ताज्या बातम्या