Advertisement

उरण ते भाऊचा धक्का बोट सेवा सुरू

प्रवाशांना सुरक्षित अंतर व सर्व नियमांचे पालन करून प्रवास करावा लागणार आहे. ही बोट सेवा सुरू झाल्याने उरणमधून रोज मुंबईत जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

उरण ते भाऊचा धक्का बोट सेवा सुरू
SHARES

अनलाॅकननंतर राज्यातील वाहतूक व्यवस्था पुर्ववत होत असताना आता उरण ते मुंबई बोट सेवाही सुरू करण्यात आलीआहे. कोरोनामुळे मागील साडेपाच महिने ही बोट सेवा बंद होती.  आता उरण (मोरा) ते मुंबईतील भाऊचा धक्कादरम्यान असलेली प्रवासी जलवाहतूक गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली आहे.

प्रवाशांना सुरक्षित अंतर व सर्व नियमांचे पालन करून प्रवास करावा लागणार आहे. ही बोट सेवा सुरू झाल्याने उरणमधून रोज मुंबईत जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लाॅकडाऊन लागू करण्यात आला होता. लाॅकडाऊनमध्ये रस्ते वाहतुकीसह हवाई व जलवाहतूकही बंद केली होती.

मागील महिन्यापासून राज्यात वाहतूक व्यवस्था पुर्ववत होत आहे. उरण ते मुंबई बोट सेवा मार्च महिन्यापासून बंद होती. आता गुरूवारपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू करण्याची मागणीही प्रवाशांकडून करण्यात आली होती.

सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली ही सेवा महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने पुन्हा एकदा सुरू केली आहे.  उरणमधून रोज मुंबईत हजारो प्रवाशी येत असतात. ही बोट सेवा सुरू झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 



हेही वाचा -

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ, अडीच लाखांवरून १५ लाखांवर

'क्यूआर कोड'ला बेस्ट प्रवाशांचा कमी प्रतिसाद



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा