Advertisement

लस घ्या आणि इंडिगोची 'ही' ऑफर मिळवा

तुम्ही व्हॅक्सिन घेतलं आहे? आणि पुन्हा एकदा प्रवास करण्यासाठी तयार आहात. मग तुमच्यासाठीच एक खास ऑफऱ इंडिगोनं आणली आहे.

लस घ्या आणि इंडिगोची 'ही' ऑफर मिळवा
SHARES

तुम्ही व्हॅक्सिन घेतलं आहे? आणि पुन्हा एकदा प्रवास करण्यासाठी तयार आहात.  मग तुमच्यासाठीच एक खास ऑफऱ इंडिगोनं आणली आहे. बुधवारी इंडिगोनं लसीकरण केलेल्या प्रवाशांसाठी १० टक्क्यांची सूट दिली आहे. मात्र मर्यादित जागांसाठी ही सूट देण्यात येणार आहे, हे देखील प्रवाशांनी ध्यानात ठेवावं.

इंडियनगोच्या एका प्रेस निवेदनात म्हटलं आहे की, “ज्या ग्राहकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे १ किंवा दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना बुकिंग करताना बेस भाड्यावर १० टक्केपर्यंत सूट मिळू शकते.”

ही ऑफर फक्त १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लसीकरण केलेल्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. जे बुकिंगच्या वेळी भारतात आहेत आणि त्यांना आधीपासूनच देशात कोविड १९ची लस देण्यात आली आहे.

"ज्या प्रवाशांनी बुकिंगच्या वेळी ऑफर मिळवली आहे त्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी दिलेला वैध कोविड -१९ लसीकरण प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. वैकल्पिकरित्या, ते लसीकरण स्थिती आरोग्यावर प्रदर्शित करू शकतात. विमानतळ चेक-इन काउंटर / बोर्डिंग गेटवर आरोग्य सेतू अनिर्वाय आहे, असं इंडिगोनं स्पष्ट केलं आहे.

“ऑफर अंतर्गत मर्यादित जागा उपलब्ध आहे आणि म्हणूनच यादी उपलब्धतेच्या अधीन सूट देण्यात येईल. या ऑफरला इतर कोणत्याही ऑफर, योजना देऊन एकत्रित करता येणार नाही. ही ऑफर सध्या फक्त इंडिगो वेबसाइटवर उपलब्ध आहे. दुसऱ्या कुठल्याही वेबसाईट किंवा अपद्वारे ही सूट मिळवता येणार नाही.

इंडिगोचे मुख्य धोरण आणि महसूल अधिकारी संजय कुमार म्हणाले: "देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असल्यानं या लक्षासाठी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. याद्वारे राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला हातभार लावण्याची आपली जबाबदारी आहे. या ऑफरमुळे केवळ लसीकरण मोहीमेला बळकटी मिळेल.”



हेही वाचा

जेट एअरवेज पुन्हा उडणार? NCLTनं स्वीकारला कारलॉक-जालनचा प्रस्ताव

अंधेरी सब वे बंद असल्याने 'हा' आहे पर्यायी मार्ग

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा