Advertisement

१७ फेब्रुवारीपासून मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सुरू होणार

बेलापूर ते दक्षिण मुंबईतील भाऊचा धक्का या स्पीड बोटीने फक्त ३० मिनिटे आणि कॅटामरन बोटीने ४५ ते ५० मिनिटे लागतील.

१७ फेब्रुवारीपासून मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सुरू होणार
SHARES

बहुप्रतीक्षित मुंबई (Mumbai) ते बेलापूर (Belapur) वॉटर टॅक्सी सेवेचं उद्घाटन १७ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.

बेलापूर इथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे. बेलापूर इथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का इथं पोहोचण्यास स्पीड बोटीनं फक्त ३० मिनिटं तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

स्पीडबोटीचं भाडं प्रति प्रवासी ८०० ते १२०० रुपये तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी २९० रुपये इतकं ठेवण्यात आलं आहे. बेलापूर इथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावरसुद्धा प्रवासी सेवा चालवण्यात येणार आहे.

मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूकीचा पुढील टप्पा म्हणून नवी मुंबईपासून मुंबई, एलिफंटा, जेएनपीटी अशा विविध जलमार्गांवर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी बेलापूर, नवी मुंबई इथं सुमारे ८.३७ कोटी खर्च करुन प्रवासी जेट्टीचं बांधकाम करण्यात आलं आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत ५० : ५० प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरे आणि खाड्यांमधून दरवर्षी सुमारे २ कोटी प्रवासी जलवाहतूकीद्वारे प्रवास करतात. जलवाहतूकीचा पर्याय हा किफायतशीर, इंधन आणि वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणस्नेही असतो.

या वॉटर टॅक्सी सेवेमुळं नवी मुंबईत निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुद्धा जोडणी मिळणार आहे. नवी मुंबईमधून थेट एलिफंटा इथं जाण्यासाठी सेवा मिळणार असल्यानं पर्यटनालासुद्धा चालना मिळणार आहे.



हेही वाचा

हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार 'या'वर्षी होणार

पुढील महिन्यापासून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' धावण्याची शक्यता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा