Advertisement

'परे'च्या महिला डब्याचा लोगो बदलला

पश्चिम रेल्वेनं लोकलमध्ये महिलांचा डबा दर्शविणारा साडी आणि पदर घेतलेल्या महिलेचा लोगो बदलला आहे. या लोगोऐवजी आता फॉर्मल सूट परिधान केलेल्या स्त्रीचा लोगो लावण्यात आला आहे.

'परे'च्या महिला डब्याचा लोगो बदलला
SHARES

पश्चिम रेल्वेनं लोकलमधील महिलांचा डबा दर्शविणारा साडी आणि पदर घेतलेल्या महिलेचा लोगो बदलला आहे. या लोगोऐवजी आता फॉर्मल सूट परिधान केलेल्या स्त्रीचा लोगो लावण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेनं सद्यस्थितीत फॉर्मल सूट परिधान केलेला नवा लोगो असलेले १२ डबे तयार केले आहेत. यांपैकी २ डबे प्रवाशांच्या सेवेत लवकरच उपलब्ध होणार आहेत.

नवा लोगो

मागील अनेक वर्षांपासून लोकलच्या महिला डब्यावरील साडी आणि पदर असलेली महिला बदलत्या काळातील आधुनिक स्त्रियांचे प्रभावी प्रतिनिधीत्व करत नसल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. याबाबत पश्चिम रेल्वेनं केलेल्या निरीक्षणानंतर नवा लोगो बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.


आत्मविश्वास आणि आधुनिकता

पश्चिम रेल्वे प्रशासन शहरांमधील आधुनिक महिलांचं प्रतिनिधीत्व करेल अशा प्रकारच्या लोगोचा शोधात होतं. या काळातील स्त्री ही स्वावलंबी आणि यशस्वी आहे. त्यामुळं आधुनिक महिलेसाठी साडी आणि पदर असलेला लोगोच्या नवा लोगोच्या विचार करण्यात आला. त्यावेळी अनेक डिझाइन्सची पडताळणी केल्यानंतर सूट परिधान केलेल्या महिलेच्या लोगोला मान्यता देण्यात आली. या नव्या लोगोमध्ये महिलेचा आत्मविश्वास आणि आधुनिकता दिसत असल्याचे रेल्वेचं म्हणणं आहे.

'हा डबा महिलांचा आहे'

लोकलमधील 'हा डबा महिलांचा आहे', हे इतर प्रवाशांच्या लक्षात येण्यासाठी हा लोगो आकारानं थोडा मोठा बनवण्यात आला आहे. त्याशिवायत लोकलच्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी आरक्षित असलेल्या डब्याला पिवळा रंग देण्यात येणार असल्याची संमजतं आहे.



हेही वाचा -

१५ दिवस आधीच जाहीर झाला बी. काॅम. चा निकाल

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: ३ फरार डॉक्टरांना डीनची नोटीस



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा