Advertisement

एसी लोकलच्या महिला डब्यात बॅरिकेड्स लागणार

एसी लोकलच्या महिला बोगीत मेट्रोप्रमाणे बॅरिकेड्स बसविण्याचा विचार असल्याचं पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी सांगितलं.

एसी लोकलच्या महिला डब्यात बॅरिकेड्स लागणार
SHARES

एसी लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेने पुढाकार घेतला असून अाता महिला बोगीत मेट्रोप्रमाणे बॅरिकेड्स बसविण्याचा विचार असल्याचं पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी सांगितलं. लवकरच याबाबतीत अाम्ही निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.


सुरक्षेच्या दृष्टीने उचलणार पाऊल

नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या एसी लोकलमध्ये सलग बोगींची रचना अाहे. महिला बोगीत पुरुष प्रवाशांना बंदी आहे. तरीही बोगीच्या सलग रचनेमुळे महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात येणार आहे. त्यामुळे महिला बोगीत बॅरिकेड्स बसविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.


वर्गीकरणासाठी बॅरिकेड्सची उभारणी

सध्या एसी लोकलमध्ये पहिली आणि शेवटची बोगी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. लवकरच, एसी लोकलमध्ये महिला आणि पुरुष बोगीमध्ये वर्गीकरण करण्यात येणार असून त्यासाठी बॅरिकेड्सची उभारणी करण्यात येणार आहे. त्यानुसार एसी लोकलमध्ये बॅरिकेड्स बसवले जाणार आहेत.



हेही वाचा-

मुंबईकरांनो, कन्फ्युज नका होऊ!, 'हे' आहेत एसी लोकलचे दर आणि वेळापत्रक

लोकलचे धक्के खाऊन कंटाळलात, तयार राहा जलवाहतुकीच्या नव्या पर्यायासाठी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा