२१ लाख रेल्वे प्रवाशांना मिळाला परतावा

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून संपूर्ण देशभरात लाॅक डाऊन आहे. रेल्वेनाही आपल्या सर्व मेल -एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. त्यामुळे आगाऊ तिकीट बुकिंग करणारे प्रवाशी चिंतेत होते.

२१ लाख रेल्वे प्रवाशांना मिळाला परतावा
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून संपूर्ण देशभरात लाॅक डाऊन आहे. रेल्वेनाही आपल्या सर्व मेल -एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. त्यामुळे आगाऊ तिकीट बुकिंग करणारे प्रवाशी चिंतेत होते. मात्र, रेल्वेने त्यांना लवकरात लवकर परतावा मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आता तिकिटांच्या रकमेचा परतावा प्रवाशांना मिळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मार्च महिन्यात पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागातील 9 लाख प्रवाशांना 62 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वेवरील एकूण 21 लाख प्रवाशांना 131 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.


कोरोनामुळे मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात प्रवाशांकडून तिकिटे रद्द करण्याचे प्रमाण वाढले. तरमार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात लॉकडाऊनमुळे प्रवासी गाड्या संपूर्णपणे रद्द करण्यात आल्या.  १ ते ३० मार्च या कालावधीत पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागात एकूण ९ लाख २१हजार २१४ प्रवाशांचा प्रवास रद्द झाला. प्रवास रद्द झालेल्या प्रवाशांना एकूण ६२,३०,०७,५६१ रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वेवर मार्च महिन्यात २० लाख ९० हजार प्रवाशांना एकूण १३१.८३ कोटींचा परतावा देण्यात आला.


सध्या ऑनलाइन पद्धतीने तिकिटे काढलेल्या प्रवाशांना परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांनी तिकीट रद्द करू नये. तिकीट खिडकीवरून तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना सर्व व्यवहार सुरू केल्यानंतर पैसे परत मिळवणे शक्य होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.हेही वाचा -

महापालिकेकडून मुंबईतील 'इतकी' ठिकाणं सील

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर 'टिकटॉक' केल्याप्रकरणी तक्रार
संबंधित विषय