Advertisement

पश्चिम रेल्वेवर आजपासून वाढीव एसी लोकल फेऱ्या

वाढीव लोकल फेऱ्यांनंतर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ३२ वर पोहोचली आहे

पश्चिम रेल्वेवर आजपासून वाढीव एसी लोकल फेऱ्या
(File Image)
SHARES

आज, सोमवारपासून पश्चिम रेल्वेवर १२ वातानुकूलित लोकलफेऱ्या वाढणार आहेत. मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची वाढ झाल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही वातानुकूलित फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेटदरम्यान प्रत्येकी ५ अशा एकूण दहा लोकल फेऱ्या धावणार आहेत. त्याचबरोबर अंधेरी ते विरार आणि भाईंदर ते चर्चगेटदरम्यान प्रत्येकी एक लोकलफेरी अशा पद्धतीने लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

वाढीव लोकल फेऱ्यांनंतर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ३२ वर पोहोचली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

डिसेंबर २०१७ मध्ये पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल धावली. सुरुवातीला १२ फेऱ्यांनंतर काही महिन्यांपूर्वी आणखी आठ फेऱ्या वाढविण्यात आल्यानंतर फेऱ्यांची संख्या २० पोहोचली. त्यानंतर आता १२ फेऱ्या वाढवल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या ३२वर पोहोचली आहे.

वातानुकूलित लोकलच्या तिकिटदरांमध्ये कपात झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने वातानुकूलित फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ५ मेपासून वातानुकूलित लोकलच्या तिकीटदरात ५० टक्के कपात झाली.

यानंतर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्यांनाही प्रतिसाद वाढला आहे. आधी दिवसाला सुमारे तीन हजार तिकिटांची विक्री होत होती. आता पाच हजारांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री होत आहे.हेही वाचा

Mumbai Latest News">मध्य रेल्वेच्या 'या' मार्गांवर एसी लोकलच्या 12 फेऱ्या वाढवल्या, पाहा टाईमटेबल 

17 मे पासून 'ही' ट्रेन 2 विस्टाडोम कोचसह धावणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा