Advertisement

रेल्वेची अशीही कारवाई


रेल्वेची अशीही कारवाई
SHARES

महिला दिनाचे औचित्य साधून बसवण्यात आलेल्या 'टॉक बॅक’ प्रणाली आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून पश्चिम रेल्वेने दंड वसूली केली आहे. अनधिकृतपणे महिला डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या 16,012 प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कारवाई केली असून 3,30,600 रु. दंड वसूली करण्यात आली आहे. कारवाई अंतर्गत दंड वसूली तर करण्यात आलीच त्याचबरोबर रेल्वे कायद्यानुसार 14 प्रवाशांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंर्पक अधिकारी रवींद्र भाकर यांनी ही माहिती दिली.

लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांवर चोरीच्या उद्देशाने किंवा अन्य कारणाने हल्ले होतात. गेल्या काही वर्षांपासून घडलेल्या अनेक घटनांमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अनेक सुरक्षेच्या उपाययोजना केल्यानंतर आता तात्काळ मदत मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेकडून लोकलच्या महिला डब्यात ‘टॉक बॅक’ प्रणाली आणि सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. दरम्यान, रेल्वे स्थानकावर फिरणाऱ्या गर्दुल्ल्यांवर यावेळी कारवाई करण्यात आल्याची माहितीही यावेळी भाकर यांनी दिली.

पश्चिम रेल्वेने पाकिट मार, हेल्पलाईन नंबर, सामान चोरी करणारे, महिलांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूली केली. वेगवेगळ्या कारणाने पश्चिम रेल्वे पोलिसांनी 1,88,588 प्रवाशांवर कारवाई करून 4,94,84,993 रुपयांची दंड वसूली करण्यात आली आहे. अनेक प्रवाशांना रेल्वे कायद्यानुसार अटक देखील करण्यात आल्याची माहिती रवींद्र भाकर यांनी दिले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा