Advertisement

लोअर परळचा डिलाइल पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात


लोअर परळचा डिलाइल पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात
SHARES

अंधेरीतील गोखले पूल कोसळल्यानंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनानं मुंबईतील ४४५ पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं. त्या ऑडिटमध्ये मुंबईतील काही पूल धोकादायक असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर काही पुलांची डागडूजी करण्यात आली तर त्यातीलच एक लोअर परळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. लोअर परळचा डिलाइल पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या पाडकामाला शनिवार १८ ऑगस्टपासून सुरुवात झाली.


पाडकामासाठी ३ महिने

पश्चिम रेल्वे, आयआयटी, महापालिकेच्या संयुक्त पथकानं केलेल्या पाहणीत लोअर परळचा पूल धोकादायक म्हणून जाहीर केला. त्यांनतर २४ जुलैपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पूलाच्या प्राथमिक स्तरावरील पाडकामाला सुरुवात झाली आहे. पूर्ण पूल पाडण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं.


७ कोटी २२ लाखांचं कंत्राट

रेल्वेनं धोकादायक ठरवलेला हा पूल पाडण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी आलेल्या निविदांमधून सात कोटी २२ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आलं आहे. हा पूल पाडण्याचा पहिला टप्पा शनिवारपासून सुरु करण्यात आला. त्यात पुलावरील टाइल्स, दगड काढण्यात आले. तसंच या पुलावरील संरक्षक जाळीदेखील काढून टाकण्यात येत आहे.


प्रवाशांची अडचण होणार

हा पूल बंद करण्यात आल्यानंतर याठिकाणी काही काळ प्रचंड गर्दी उसळली होती. लोअर परळ स्थानकाला जाणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी अडचण यामुळे झाली होती. त्यावर रेल्वेकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र हा पूल बांधून पूर्ण होईपर्यंत परऴ, एल्फिस्टन परिसरतील मुंबईकरांना अडचणींचा सामना करत वाट काढावी लागणार आहे.


हेही वाचा -

लोअर परळ-एल्फिन्स्टनचा 'भाव' पडणार?

लोअर परळ पुलावरून सेना-मनसेमध्ये रंगला सामना



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा