घाटकोपरमध्ये ‘बालकोत्सव’ची धूम

 Mumbai
घाटकोपरमध्ये ‘बालकोत्सव’ची धूम
घाटकोपरमध्ये ‘बालकोत्सव’ची धूम
घाटकोपरमध्ये ‘बालकोत्सव’ची धूम
घाटकोपरमध्ये ‘बालकोत्सव’ची धूम
घाटकोपरमध्ये ‘बालकोत्सव’ची धूम
See all

घाटकोपर - महानगरपालिका शाळेतल्या लहान मुलांसाठी शुक्रवारी ‘बालकोत्सव’चं आयोजन करण्यात आलं होतं. पार्कसाइट मराठी शाळा क्र. चार आणि घाटकोपर (प.) येथील बर्वेनगर मराठी शाळा क्र. पाच या दोन्ही शाळांमधल्या सभागृहात बालकांनी यंदा नृत्य, गाणी अशा विविध कला सादर केल्या. पार्कसाइट शाळेतील मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. तर बर्वेनगर शाळेतील सभागृहात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारच्या माध्यमातून भारतमातेविषयी अभिमान, महाराष्ट्रातील सणांचे महत्त्व आणि पर्यावरणाचे संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Loading Comments