बाप्पाचं विसर्जन ढोल-ताशाच्या गजरात

मालाड - बाप्पाच्या आगमनाचा स्वागत सोहळा जसा पांरपारिक ढोल-ताशांच्या गजरात पार पडला, त्याच थाटात निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी श्री रणझुंजार प्रतिष्ठान ढोलताशा पथक सज्ज झाले आहे. यावेळी मालाडमधील गोरसवाडी ते लिबर्टी गार्डनपर्यंत मानाच्या गणपतीची मिरवणूक काढली जाणार असून पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजवून बाप्पाला निरोप दिला जाणार. यावेळी 120 मुले-मुली सहभागी होऊन बाप्पाला पुणेरी ढोलाताशांच्या थाटात निरोप देणार आहेत. यादरम्यान रणझुंजार प्रतिष्ठान स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा संदेशही देणार आहे.

Loading Comments