गिरगांव - टिळकांच्या गणेशोत्सवाची संकल्पना जपणारे मुंबईतल एकमेव मंडळ म्हणजे गिरगांवचा महाराजा मंडळ..संस्कृती – पंरपरा जोपासतानाच सामाजउपयोगी कार्यासाठी गिरगांवचा राजा हे मंडळ प्रत्येक वर्षी पुढाकार घेताना दिसते.या मंडळाला यंदा 89 वर्ष पुर्ण झाली आहे. या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे गेली 89 वर्षे शाडू मातीची गणेशाची मूर्ती बसवतात. या राजाची पर्यावरणाचा राजा म्हणूनही ओळख आहे. श्री राजन पाटकर दरवर्षी ही मूर्ती तयार करतात. पंतप्रधान नरेद्र मोदींनी यांनी आपल्या मनकी बात या पर्यावरण विषय कार्यक्रमात गिरगांव राजाच कौतूक केले होते. या राजाच्या दर्शनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह,मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी उपस्थिती दर्शवली होती.तसंच या मंडळाकडून महिलांसाठीही अनेक उपक्रम राबवले जातात.