Advertisement

चुनाभट्टी परिसरात पसरले घाणीचे साम्राज्य


चुनाभट्टी परिसरात पसरले घाणीचे साम्राज्य
SHARES

चुनाभट्टीतल्या ताडीपिठ्ठा परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरलंय..खासगी जागेवरुन वाहत असलेल्या गटाराच्या डागडुजीला माजी नगरसेविका नकार देत असल्यामुळे याठिकाणी साफसफाईचे काम केलं जात नाही. गटाराची अनेक वर्ष डागडुजी न झाल्याने गटारातले सांडपाणी नागरिकांच्या घरात घुसतंय. या सर्व परिस्थितीबद्दल नगरसेवकांना सांगितलं असता त्यांनी काही दिवसांपूर्वी काम ही सुरु केलं.मात्र याच परिसरातल्या माजी नगरसेविकेने ते काम बंद पाडलं. गटार असलेली जागा खासगी असल्याचं कारण नगरसेविकेने दिले..तर दुसरीकडे ही नगरसेविका पैशाच्या जोरावर याठिकाणी दादागिरी करत असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरु आहे. मात्र या वादाचा त्रास परिसरातील अन्य रहिवाशी आणि लहान मुलांना होत आहे. स्थानिकांना अनेक रोगांना सामोर जावं लागतंय..डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारात अधिक वाढ झालीय. तसंच स्थानिक नेत्यांनी तत्काळ याठिकाणी लक्ष घालून यातून तोडगा काढावा अशी मागणी रहिवाशांनी केलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा