पोलिसाला चावला ड्रायव्हर

 Girgaon
पोलिसाला चावला ड्रायव्हर
Girgaon, Mumbai  -  

गावदेवी - युटर्न घेण्यास मज्जाव केल्यामुळे पॅसेंजरनं ट्रॅफिक हावालदाराला चावल्याचा धक्कादायक प्रकार गावदेवी परीसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी मालव झवेरी आणि हार्दिक झवेरी या दोघा भावंडांना अटक केली. दोघांना कोर्टात हजर केले असता त्यांची 25 हजारांच्या व्ययक्तिक जीमीनावर सुटका करण्यात आली.  

ट्रॅफिक हवालदार हेमंत सूर्यवंशी हे ओपेरा हाउस जंक्शन परीसरात नियुक्त होते.  एका गाडीनं ओपेरा हाउस जंक्शनवर युटर्न घेतल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सूर्यवंशी यांनी तात्काळ त्या गाडीला रोखलं. मात्र हवालदार व्यस्त असल्याचं बघून एका ओला कारनंही युटर्न मारला. सूर्यवंशी यांनी त्याला देखील तात्काळ अडवलं. ओलाचा चालक हवालदाराशी हुज्जत घालत असताना अचानक ओलातील पेसेंजर ऊतरले. त्यांनी सुर्यवंशींना मारण्यास सुरुवात केली.  यातील एकानं  सूर्यवंशीना चावला घेतला. 

 

Loading Comments