चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर घाणीचं साम्राज्य

 Chembur Govandi Road
चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर घाणीचं साम्राज्य
Chembur Govandi Road, Mumbai  -  

चेंबूर - एकीकडे देशात स्वच्छ भारत अभियान राबवलं जात असताना रेल्वे प्रशासन परिसरात घाणीचं साम्राज्य पसरल्याचं दिसून येतंय. चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. चेंबूर रेल्वे स्थानक हे हार्बर रेल्वे मार्गावरील महत्वाचं स्थानक आहे. पण, सध्या या स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. रेल्वे तिकीटाच्या अाधारे प्रवाशांकडून कर वसूल केला जातो. त्यामुळे परिसरात स्वच्छता ठेवणं हे रेल्वेचं कर्तव्य असल्याचं मत प्रवासी राहुल शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

Loading Comments