अडगळीत अडकले मालाड रेल्वे तिकीट घर

 Mumbai
अडगळीत अडकले मालाड रेल्वे तिकीट घर
अडगळीत अडकले मालाड रेल्वे तिकीट घर
view all

एकीकडे पश्चिम उपनगरीय मार्गावर रेल्वे प्रशासन नवनवीन सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे मालाड पूर्वेकडील तिकीट घराच्या दुरुस्तीकडे प्रशासनान दुर्लक्ष केलंय. सध्या या तिकीट घराला अडगळीच्या खोलीचं स्वरूप आलंय. आधीच अरुंद जागेत असलेल्या या तिकीट घराचा परिसर फेरीवाले, भीक मांगणारे यांनी अतिक्रमण करून उच्छाद मांडला आहे. त्यातच या परिसरात मोठया प्रमाणात लाकडे, मातीचा ढीग जमा झाला आहे. त्यामुळे इथल्या प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.तसंच तिकीट घर परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणीही प्रवाशांनी केलीय.

Loading Comments