घाटकोपरमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

 Pant Nagar
घाटकोपरमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

घाटकोपर - पंंतनगर येथील शिवाजी शिक्षण संस्था मल्टि-पर्पज टेक्निकल हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात 'मराठी भाषा दिन' साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धा आणि कविता वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमात कवी, नाटकार आणि लेखक वि. वा. शिरवाडकर यांचा परिचय भावी पिढीला करून देण्यात आला. तसंच विद्यार्थ्यांनी त्यांना आवडलेल्या पुस्तकांचे परिक्षण वक्तृत्वाच्या माध्यमातून सादर केले. या वेळी विद्यार्थांनी स्वत: तयार केलेल्या कविता सादर केल्या. मराठी भाषा दिनानिमित्ताने शाळेत एक दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं.

Loading Comments