प्रभादेवीत 'संगीत संध्या'!

 Prabhadevi
प्रभादेवीत 'संगीत संध्या'!
Prabhadevi, Mumbai  -  

प्रभादेवी - शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी 'संगीत संध्या' या कार्यक्रमाचे आयोजन प्रभादेवीमध्ये करण्यात आले होते. प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत झालेल्या या कार्यक्रमात रागरीत या संस्थेची स्थापना देखील करण्यात अली.

या संस्थेने रागरीत डॉट कॉम नावाचं संकेतस्थळही तयार केलं आहे. यावर जाऊन प्रत्येक कलाकाराला आपलं गाणं किंवा म्युझिक अपलोड करता येणार आहे. तसेच ते संगीत जगभरातील प्रेक्षकांना ऐकताही येणार आहे.

शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात रागरीतच्या संस्थापिका संचयिता घोषाल यांनी आपली कला सादर केली.

या कार्यक्रमात सरोद वादक पंडित ब्रिज नारायण, उस्ताद लियाकत अली खान, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर आणि दिग्गज कलाकारांनी या वेळी त्यांची कला सादर केली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला.

Loading Comments