नेव्हल गोदी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

 Marine Drive
नेव्हल गोदी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
नेव्हल गोदी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
See all

मरिन लाईन :  आपल्या विविध मागण्यांसाठी नेव्हल डॉकच्या शेकडो कर्मचा-यांनी आरोग्य विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नेव्हल एम्प्लॉईज युनियनच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व नेव्हल एम्प्लॉईज युनियनचे पेट्रन मुत्थु वीरप्पन, अध्यक्ष पिताम्बस पाणीगिरी तसेच सेक्रेटरी आर. के. सिंग यांनी केले.

केंद्र शासनाची आवास (घरे) तसेच सीजीएचएस सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्री यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा औद्योगिक कर्मचाऱ्यांनाही देण्यात याव्यात, या मागणीसाठी ओल्ड सीजीओ (प्रतिष्ठा भवन) येथे रविवारी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान युनियनच्या शिष्टमंडळाने सीजीएचएस सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्री व इस्टेट व्यवस्थापक यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन त्यांना दिले. तसेच या मागण्यांवर वेळीच तोडगा काढण्यात आला नाहीतर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युनियनच्या नेत्यांनी दिला. या आंदोलनात पी.एस.पवार, सुनील पवार, अशोक ढसाळ, लक्ष्मण घाणेलू यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. 

Loading Comments