Advertisement

रुईया महाविद्यालयात व्याख्यानमाला


रुईया महाविद्यालयात व्याख्यानमाला
SHARES

माटुंगा - रामनारायण रुईया महाविद्यालायत 23, 24 आणि 25 जानेवारी अशा तीन दिवस रंगलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमालेचा समारोप सोहळा 25 जानेवारी 2017 ला झाला.

रुईया महाविद्यालयाच्या G-12 या वर्गात तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी 'विनाशकाले' दुसऱ्या दिवशी 'बदलते सांस्कृतिक पर्यावरण' आणि तिसऱ्या दिवशी 'आधुनिक शिक्षण पद्धती : वेग व मर्यादा' या विषयांवर व्याख्यानालेचे आयोजन करण्यात आले. अतुल देऊळगावकर, पुष्पा भावे, डॉ. अनिरुद्ध पंडित या विविध क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व असणाऱ्या या वक्त्यांनी आपली मते श्रोत्यांपुढे मांडली.

जागतिकीकरणाला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्रातील होणाऱ्या बदलांचा आढावा या तीन दिवसीय व्याख्यानमालेत घेण्यात आला. महाविद्यालयातील मराठी विभाग तसंच इतर शिक्षक वर्ग आणि आजी माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा