Advertisement

९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला

साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते.

९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला
SHARES

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. हे संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते. यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी सरहदने केली होती. मात्र, साहित्य महामंडळाने स्थळ निवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली आहे, असे कौतिकराव ठाले पाटील म्हणाले. 

९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये पार पडलं होतं. ९३ व्या संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी झाली होती. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा