श्रीपाद जोशी यांचा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

श्रीपाद जोशी यांनीच नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्याचं म्हणत त्यांच्यावर मोठी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीपाद जोशी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलने साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे.

SHARE

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी अखेर बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. साहित्य संमेलनाच्या उद्धाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना देण्यात आलेलं निमंत्रण मागे घेण्यात आलं आणि मग त्यावरून चांगलाच वाद रंगला.  तर सहगल यांचं निमंत्रण रद्द होण्यासाठी श्रीपाद जोशी जबाबदार आहेत. त्यांनी हा निर्णय घेण्याआधीच साहित्यिकांशी चर्चा करायला हवी होती, अशा शब्दात श्रीपाद जोशी यांच्यावर टीका होत होती. या टीकेनंतर अखेर बुधवारी त्यांनी राजीनामा दिला आहे.


प्रसारमाध्यमांना टाळलं 

नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मागे घेतल्यानंतर साहित्य क्षेत्रासह सर्वच स्तरातून टीका होत आहे. अनेक साहित्यिकांनी तर साहित्य संमेलनावरच बहिष्कार टाकला आहे. तर श्रीपाद जोशी यांनीच नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्याचं म्हणत त्यांच्यावर मोठी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीपाद जोशी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलने साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे. मात्र यावेळी राजीनाम्याचं कारण मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. तर प्रसारमाध्यमांनाही त्यांनी टाळलं आहे. 


 गुरूवारी बैठक

श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिल्यानं आता अध्यक्षपदाची सुत्रं उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे साहित्य संमेलनासाठी आता केवळ दोन दिवस उरले असताना अजूनही उद्घाटक ठरत नसल्याचं चित्र आहे. गुरूवारी यवतमाळमध्ये साहित्य संमेलन महामंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. तर उद्धाटक नक्की कोण हे ही ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तमाम साहित्यप्रेमींचं लक्ष आता गुरूवारच्या बैठकीकडे लागलं आहे.हेही वाचा - 

अरूणा ढेरेंनी संमेलनावर बहिष्कार टाकावा - भालचंद्र मुणगेकर
संबंधित विषय
ताज्या बातम्या