धमकी मिळूनही ना.धों. महानोर साहित्य संमेलनाला जाणार

संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाला काही कडव्या संघटनांचा विरोध असल्यामुळे संमेलन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

धमकी मिळूनही ना.धों. महानोर साहित्य संमेलनाला जाणार
SHARES

उस्मानाबाद इथं आयोजित करण्यात येत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून सुरूवात झाली. या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाला काही कडव्या संघटनांचा विरोध असल्यामुळे संमेलन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्या वतीने हे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. हे संमेलन रविवारपर्यंत चालणार असून् त्यात निरनिराळ्या कार्यक्रमांचा समावेश आहे. संमेलनासाठी राज्यभरातील प्रकाशनांची २०० दालने उभारण्यात आली आहेत.

हेही वाचा- साहित्य संमेलन: ख्रिश्चन व्यक्ती अध्यक्षपदी कशाला? फ्रान्सिस दिब्रिटो यांना हटवण्यासाठी धमक्यांचे फोन

दिब्रिटो यांच्या नावाला विरोध असल्याने ज्येष्ठ साहित्यिक कवी ना. धों. महानोर यांनी संमेलनाला जाऊ नये, अशी धमकी त्यांना संमेलनाच्या पूर्वसंध्येला मिळाली होती. त्यावरून संमेलनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं.

त्यावर प्रतिक्रिया देताना महानोर म्हणाले, संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी ब्राह्मण महासंघाने मला फोनवरून दिली असली, तरी मी संमेलनाला जाणारच. संमेलनाच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असून त्यांनी संमेलन कार्यक्रमाला योग्य ती सुरक्षा पुरवावी.

संबंधित विषय