Advertisement

सावरकर स्मारकात व्यंगचित्रांचं प्रदर्शन


सावरकर स्मारकात व्यंगचित्रांचं प्रदर्शन
SHARES

दादर - देशभरात व्यंगचित्रकारांची संख्या क्वचितच आहे. याचं मुख्य कारण म्हणजे व्यंगचित्र शिकवणाऱ्या खासगी कार्यशाळांची कमतरता. यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या वतीने दर रविवारी संध्याकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत व्यंगचित्राची कार्यशाळा घेतली जाते. गेल्या तीन वर्षांपासून ही कार्यशाळा घेतली जाते. तसेच वर्षभरातल्या निवडक अशा व्यंगचित्रांचे दरवर्षी दादरच्या सावरकर स्मारकात प्रदर्शन भरवले जाते. यंदाही 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान या व्यंगचित्रांचे प्रदर्शन सावरकर स्मारकात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये इयत्ता पहिलीपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येक व्यंगचित्रकाराच्या चित्रांचा समावेश आहे.  इच्छा असलेल्या प्रत्येकाला शास्त्रशुद्धपणे व्यंगचित्र शिकता यावे यासाठी ही कार्यशाळा सुरू केल्याचे व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा