चित्र पतंग समूह

 Pratiksha Nagar
चित्र पतंग समूह
चित्र पतंग समूह
चित्र पतंग समूह
चित्र पतंग समूह
चित्र पतंग समूह
See all

सायन - चित्र पतंग या संस्थेमार्फत गुरुवारी शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. विद्यालयात विद्यार्थिनींनी रांगोळीच्या माध्यमातून उत्तम अशी कलाकृती सादर केली. या विद्यार्थिनींनी अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळी रेखाटल्या. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे निरीक्षक दानसिंग सूर्यवंशी तसंच अंकुश महाडिक, डी.एस विद्यालयाचे मुख्यध्यापक आणि इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते.

'मुलांच्या कलाकृतीला वाव देत हा कार्यक्रम गेल्या तीन वर्षापासून या विद्यालयात राबवत असल्याचं' चित्र पतंग या संस्थेचे प्रमुख श्रीनिवास आगवणे यांनी सांगितलं. तर 'तरुणांमध्ये पारंपरिक आणि संस्कृती जपणारा वारसा कमी होऊ नये म्हणून या पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजन करत असल्याचं' शिव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.

Loading Comments