सावरकर स्मारकाकडून चित्रकला स्पर्धेचं आयोजन

 Dadar
सावरकर स्मारकाकडून चित्रकला स्पर्धेचं आयोजन

दादर - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने रविवारी २९ जानेवारीला राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट अशा तीन वेगवेगळ्या स्तरांमध्ये स्पर्धेचं आयोजन केलं आहे. वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे या स्पर्धेचे विषय ठरवण्यात आले आहेत. पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी माझा देश, ‘मी, आई, बाबा चौपटीला जातो’, रक्षा बंधन, होळी, माझी बाग हे विषय देण्यात आले आहेत. तिसरी-चौथी साठी शिवजयंती, दहीकाला आणि पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी कपड्यांची होळी, त्रिखंडात गाजलेली उडी, सावरकरांचे बालपण तसंच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रभावी घटना, स्वा. सावरकर यांच्या जीवनातील प्रसंग अशा विविध विषयांवरील चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Loading Comments