Advertisement

नेहरू सेंटरमध्ये कलासक्त चित्रप्रदर्शन


नेहरू सेंटरमध्ये कलासक्त चित्रप्रदर्शन
SHARES

वरळी - नेहरू सेंटरमध्ये 14 मार्चपासून 20 मार्चपर्यंत 'कलासक्त' चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे. सय्यद इसाक अली आणि अविनाश देशमुख या दोन चित्रकारांच्या 40 चित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. 

सय्यद इसाक अली यांच्या चित्रामध्ये निसर्ग चित्र, लँडस्केप, अमूर्त चित्र, सिम्बॉलिक अशा वेगवेगळ्या चित्रांचा समावेश आहे. कला प्रेमींना विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही चित्रे आहेत. सर्वसामान्य लोकांना सहज समजतील अशी चित्र हे अली यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य आहे.

विद्यार्थ्यांमधील कलागुण जागृत व्हावेत यासाठी या प्रदर्शनात काही चित्रे अपूर्ण स्वरूपात ठेवण्यात अाली आहेत. अली हे गेली 20 वर्षे मुंब्र्याच्या शोएब उर्दू हायस्कुलमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अली यांच्या चित्रप्रदर्शनचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देणे हा आहे.

या प्रदर्शनात सहभागी असलेले दुसरे चित्रकार अविनाश देशमुख हे आहेत. अविनाश पूर्ण वेळ चित्रकार आहेत. संगीत हा विषय घेऊन त्यांनी रेखाटलेली चित्रे रसिकांचे लक्ष वेधून घेतात. ते ठाण्याला राहत असून, शनिवार-रविवार चित्र शिकू इच्छिणाऱ्या इच्छुक मुलांना मोफत शिकवतात. हे प्रदर्शन विनामूल्य असून, सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळी कला रसिकांना पाहता येणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा