Advertisement

अभिनेत्री अमृता राव झाली आई, दिला गोंडस मुलाला जन्म

आई आणि मूल दोघंही बरे आहेत. अद्याप दोघांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात कोणतीही पोस्ट अपडेट केलेली नाही.

अभिनेत्री अमृता राव झाली आई, दिला गोंडस मुलाला जन्म
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आई झाली आहे. तिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे. रविवारी सकाळी अमृतानं एका गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी तिचा नवरा आरजे अनमोल हा पूर्ण वेळ तिच्यासोबत ऑपरेशन थिएटरमध्ये हजर होता.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आई आणि मूल दोघंही बरे आहेत. अद्याप दोघांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात कोणतीही पोस्ट अपडेट केलेली नाही.

अमृतानं काही दिवसांपूर्वी पतीसोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आपण गर्भवती असल्याची आनंदाची बातमी दिली होती. अमृतानं गर्भवती असल्याची बातमी चाहत्यांना अगदी ९महिन्यांत दिली होती. आतापर्यंत अमृतानं ही बातमी लपवली होती. मात्र अखेर व्हायरल झालेल्या फोटोनंतर तिने स्वतःच याचा खुलासा केला.

अमृतानं आपला पती आरजे अनमोलसोबत एक फोटो शेअर केला होता. यात तिनं म्हटलं होतं की, ‘तुमच्यासाठी हा १० वा महिना आहे, पण आमच्यासाठी हा ९ वा महिना आहे. सरप्राईज, सरप्राईज, सरप्राईज… अनमोल आणि मी आमच्या नवव्या महिन्यात आहोत.’



हेही वाचा

'हे' दोन दिवस नेटफ्लिक्स मोफत पाहा

कंगना आणि तिच्या बहिणीची चौकशी करा, कोर्टाचे मुंबई पोलिसांना निर्देश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा