मुंबईच्या डबेवाल्यांकडून 'पद्मावती'ला विरोध


SHARE

'अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. त्याचा उपभोग प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. पण तो घेत असताना सामाजिक भानही बाळगले पाहिजे. ऐतिहासिक व्यक्तीवर चित्रपट बनवताना तर विशेष काळजी घ्यायला हवी. पण ही काळजी घेताना कोणी दिसत नाही. पद्मावती चित्रपट यशस्वी होण्यासाठी काळजी घ्यायला हवी. ती दिग्दर्शकाची जबाबदारी आहे. पण दिग्दर्शक तसे करताना दिसत नाही'. असे म्हणत मुंबईच्या डबेवाल्यांनी पद्मावती या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे.


डबेवाल्यांचे विरोध प्रदर्शन

प्रदर्शनापूर्वी वादात अडकलेल्या पद्मावती या सिनेमाच्या अडचणी अजूनही थांबताना दिसत नाही. आधी करणी सेना आणि अनेक राजपुत संघटनांनी राजस्थानमध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला. त्यातच आता मुंबईच्या डबेवाल्यांनीही या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. सोमवारी पद्मावती सिनेमाच्या विरोधात मुंबईच्या डबेवाल्यांनी विरोध प्रदर्शन करत नाराजी व्यक्त केली.


बाजीराव मस्तानी या चित्रपटात बाजीराव गाणे म्हणत नाचाताना दाखवले होते. त्यांना ते बिदागी देत असत असे अनेक कलाकार त्यांच्या पदरी बाळगले होते. तसेच राणी पद्मावती या चित्रपटात नाचताना दाखवली आहे. यामागे चित्रपट निर्मात्याचा गल्लाभरू दृष्टीकोन आहे. तो दृष्टीकोन चुकीचा आहे.

- सुभाष तळेकर, सचिव, मुंबई डबेवाला असोसिएशनहेही वाचा - 

'पद्मावती'त 'तो' सीनच नाही, भन्साळी यांनी सोडलं मौन!


संबंधित विषय