Advertisement

सलमानला प्रशांतचं म्युझिकल बर्थडे गिफ्ट!

गुरूवारी २७ डिसेंबर रोजी सलमानचा वाढदिवस झाला. या निमित्त प्रशांतने एक नवं कोरं गाणं रीलीज केलं आहे. प्रशांतने 'बॅालीवूड रोमियो...' हे गाणं लिहिलं असून, ते संगीतबद्ध करून सलमानला वाढदिवसाची अनोखी संगीतमय भेट दिली आहे.

सलमानला प्रशांतचं म्युझिकल बर्थडे गिफ्ट!
SHARES

हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता सलमान खानची भाई अशी एक वेगळी ओळख आहे. बाॅलीवूडच्या या भाईवर सर्वसामान्यांपासून चित्रपटसृष्टीतील बरेच जण फिदा आहेत. कदाचित याच प्रेमाखातर 'बाजीराव मस्तानी' फेम गीतकार प्रशांत इंगोलेलाही सलमानच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्याच्यावर गीत रचण्याचा मोह आवरता आला नाही.



बॅालीवूड रोमियो

गुरूवारी २७ डिसेंबर रोजी सलमानचा वाढदिवस झाला. या निमित्त प्रशांतने एक नवं कोरं गाणं रीलीज केलं आहे. प्रशांतने 'बॅालीवूड रोमियो...' हे गाणं लिहिलं असून, ते संगीतबद्ध करून सलमानला वाढदिवसाची अनोखी संगीतमय भेट दिली आहे. 'भाई का बर्थडे साँग' अशी टॅगलाईनही त्याने या गाण्याला दिली आहे. प्रशांतबाबत सांगायचं तर त्याने यापूर्वी 'मेरी कोम', 'रेस २', 'डॅडी', 'जलेबी' यांसारख्या काही हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन केलं आहे. मागील काही दिवसांपासून तो दिग्दर्शनाकडेही वळला आहे. प्रशांतने दिग्दर्शित केलेली 'बुध' ही शॅार्टफिल्म बऱ्याच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजली आहे.


चित्रपटांतील दृश्यांचा संग्रह

सलमानच्या बर्थडे निमित्त 'बॅालीवूड रोमियो...' या गाण्याच्या रूपात प्रशांतने सलमानच्या चाहत्यांसोबत आपल्या शुभचिंतकांनाही एक अनोखी भेट दिली आहे. सलमानच्या गाजलेल्या चित्रपटांमधील बहुचर्चित दृश्यांचा संग्रह या गाण्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. यात सुरुवातीला सलमानची 'दबंग' एंट्री होते, तर शेवटी त्याचं 'टायगर' रूप पाहायला मिळतं. शिरीन व्हर्गीस यांनी हे गाणं गायलं असून, अभिजीत नाग यांनी एडीट केलं आहे. हरलँड ब्रेव्हर या गीताचे अरेंजर आणि प्रोग्रॅमर आहेत. मिक्सींग आणि मास्टरींग उत्पल दास यांनी केलं आहे.

लिंक - https://youtu.be/z57L2GrqwKY



हेही वाचा- 

'ठाकरी' संवादामुळे टाॅलिवूड नाराज

'ठाकरे'ची वाट कुणीही अडवू शकत नाही- संजय राऊत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा