Advertisement

भगनानींसाठी 'रक्तब्रम्हांड' रचणार राही बर्वे?

हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणातच 'तुंबाड'सारखा अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवणारा मराठमोळा दिग्दर्शक राही अनिल बर्वे आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. भगनानी पिता-पुत्र या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

भगनानींसाठी 'रक्तब्रम्हांड' रचणार राही बर्वे?
SHARES

हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणातच 'तुंबाड'सारखा अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवणारा मराठमोळा दिग्दर्शक राही अनिल बर्वे आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. भगनानी पिता-पुत्र या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.


तुफान लोकप्रियता

निर्माते वासु भगनानी आणि जॅकी भगनानी हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या दिग्दर्शकासोबत आगामी चित्रपट बनवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दिग्दर्शकांच्या यादीत राही अनिल बर्वे हे एक मराठमोळं नावही सामील आहे. राहीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'तुंबाड' या चित्रपटानं तूफान लोकप्रियता मिळवली होती. समीक्षकांपासून सिनेरसिकांपर्यंत सर्वांचीच या चित्रपटाला पसंती मिळाली होती. बॅाक्स आॅफिसवरही या चित्रपटानं चांगली कमाई केली होती. आता या चित्रपटानंतर राही आपल्या आगामी चित्रपटाकडं वळला आहे.


कुली नं. १

राहीसोबतच भगनानी पिता-पुत्रांनी 'कार्तिक कॅालिंग कार्तिक' फेम दिग्दर्शक विजय लालवानी आणि 'फिल्मीस्तान' तसंच 'नोटबुक' या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक नितीन कक्कर यांनाही आगामी चित्रपटांसाठी साईन केलं आहे. यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत भगनानी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भगनानी यांनी पूजा फिल्म्सच्या बॅनरखाली यापूर्वीच 'कुली नं. १' या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खान यांच्या भूमिका असतील. याखेरीज ते सैफ अली खान आणि तब्बू यांच्यासोबत 'जवानी जानेमन' हा महत्त्वाकांक्षी चित्रपटही बनवणार आहेत.


विदूषक कथेवर आधारित 

भगनानींच्या प्रोडक्शनमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटासाठी राही नेमका कोणत्या चित्रपटाची निवड करणार आहे हा प्रश्न आहे. कारण काही दिवसांपूर्वी त्यानं दिलेल्या एका मुलाखतीत एक जबरदस्त विषय आपल्या डोक्यात असल्याचं सांगितलं होतं. 'रक्तब्रम्हांड' असं शीर्षक असलेल्या राहीच्या या चित्रपटाचं कथानक जी. ए. कुलकर्णी यांच्या 'विदूषक' या कथेवर आधारित असेल. या चित्रपटाचं शीर्षक उत्कंठावर्धक आहे, पण अद्याप तरी भगनानींसाठी आपण नेमका कोणता चित्रपट बनवणार आहोत हे राहीनं जाहिर केलेलं नाही.



हेही वाचा -

बिग बॉस कोण उंचावणार 'मनोरा विजयाचा'?

Movie Review : स्त्रीनं समाजव्यवस्थेशी दिलेला सशक्त लढा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा