Advertisement

मेट्रो स्थानकांना नाव देण्यासाठी एलआयसी, एसबीआयसह २८ कंपन्या इच्छुक

मुंबई मेट्रो ३ (Mumbai Metro 3 ) कॉरिडॉरचे (Corridor) बांधकाम आता वेगाने सुरू आहे. मेट्रो ३ कॉरिडॉरच्या स्थानकांना (station) आपली नावे देण्यासाठी आता कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे.

मेट्रो स्थानकांना नाव देण्यासाठी एलआयसी, एसबीआयसह २८ कंपन्या इच्छुक
SHARES

मुंबई मेट्रो ३ (Mumbai Metro 3 ) कॉरिडॉरचे (Corridor) बांधकाम आता वेगाने सुरू आहे. मेट्रो ३ कॉरिडॉरच्या स्थानकांना (station) आपली नावे देण्यासाठी आता कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे.  मेट्रोच्या १८ स्थानकांना आपले नाव देण्यासाठी ८७ प्रस्ताव आले आहेत. अनेक कंपन्यांनी एकापेक्षा जास्त स्थानकांना आपले नाव जोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खासगी संस्था तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांचे नाव मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रोला देण्यामध्ये रस दाखवला आहे. पुढील प्रक्रिया सुरू करून लवकरच स्थानकांची नावे निश्चित केली जातील.

या कंपन्यांनी रस दाखविला

मेट्रो स्थानकांना आपली नावे देण्यासाठी स्पर्धेत असलेल्या कंपन्यांमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC - एलआयसी), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI - एसबीआय), इंडियन ऑईल (Indian Oil), जेएसडब्ल्यू (jsw), ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (GlaxoSmithKline), पीरामल, बँक ऑफ बडोदा, यूटीआय, कोटक, आयडीएफसी फर्स्ट, एचएसबीसी, इंडिगो, स्पाइसजेट, टाइम्स समूह, ब्लॅकस्टोन, फिनिक्स मिल्स, ओबेरॉय, डीबी रियल्टी यांचा समावेश आहे.  हा कॉरिडॉर सुमारे ३३ किमी लांबीचा असून यामध्ये १८ स्थानके असतील. त्याअंतर्गत स्थानकांचे को-ब्रँडिंग केले जाते. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (Mumbai Metro Rail Corporation-एमएमआरसी) म्हटलं आहे की,  एकूण २८  कंपन्या आणि संस्थांनी स्थानकांना नावे देण्यासाठी रस दाखवला आहे. अनेक कंपन्यांनी एकापेक्षा जास्त स्थानकांना नावे देण्याचा अधिकार मिळण्यासाठी अर्ज केले आहेत.

एवढा येणार खर्च

स्थानकांच्या नावांबरोबर आपलं नाव देण्यासाठी कंपन्यांना १ ते १० कोटी रुपयांचा खर्च करावा लागू शकतो.   प्रीमियम स्टेशनवर एक वर्षासाठी  नाव लिहिण्यासाठी १ ते ५ कोटी रुपये खर्च करावे लागतील. तर सीएसएमटी, बीकेसी आणि विमानतळ स्थानकांशी त्यांची नावे जोडण्यासाठी ५ ते १०कोटी रुपये खर्च करावे लागतील.



हेही वाचा-

बजेट २०२०: नोकरदारांना मोठा दिलासा, ‘अशी’ आहे नवीन कररचना

विमा पॉलिसीवर खुश नसल्यास ती परत करू शकता, 'हा' आहे नियम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा