Advertisement

खूशखबर : सिनेमा तिकीट, टीव्ही, कॉम्प्युटर होणार स्वस्त; जीएसटी घटवला

एकूण ३३ वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात अाला अाहे. १७ वस्तू आणि ६ सेवांवर अाधी जीएसटी १८ टक्के होता. हा दर अाता १२ किंवा ५ टक्के करण्यात आला आहे. तर कॉम्प्युटर, टीव्ही (३२ इंच), टायर्स, पॉवर बँक या वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला आहे.

खूशखबर : सिनेमा तिकीट, टीव्ही, कॉम्प्युटर होणार स्वस्त; जीएसटी घटवला
SHARES

नववर्षाच्या तोंडावर केंद्र सरकारने अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करून मोठा दिलासा दिला अाहे. शनिवारी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ३१ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत २८ टक्के असलेला जीएसटी १८ टक्के अाणि १८ टक्के असलेला जीएसटी १२ अाणि ५ टक्के करण्याची घोषणा अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली. जीएसटी घटवल्यामुळे सिनेमाचं तिकीट, टीव्ही, कम्प्युटर स्वस्त होणार अाहे. नवे दर १ जानेवारीपासून लागू होणार अाहेत. जीएसटी कमी केल्यामुळे सरकारवर ५५०० कोटी रुपयांचा बोजा पडणार अाहे. 


३३ वस्तूंवरील जीएसटी घटला

जीएसटी परिषदेची बैठक झाल्यानंतर जेटली यांनी पत्रकार परिषदेत जीएसटी कपातीची माहिती दिली. एकूण ३३ वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात अाला अाहे. १७ वस्तू आणि ६ सेवांवर अाधी जीएसटी १८ टक्के होता. हा दर अाता १२ किंवा ५ टक्के करण्यात आला आहे. तर कॉम्प्युटर, टीव्ही (३२ इंच), टायर्स, पॉवर बँक या वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला आहे. तसंच ३१ मार्च २०१९ पर्यंत जीएसटी रिटर्न भरल्यास कोणताही दंड आकारला जाणार नसल्याचाही निर्णय घेण्यात अाला. 


जीएसटी परिषदेचे निर्णय

  • ३९ वस्तूंवर अाधी २८ टक्के जीएसटी होता. या वस्तू अाता ३४ राहिल्या अाहेत. 
  •  १०० रुपयांपर्यंतच्या सिनेमा तिकिटावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के केला अाहे. तर १०० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या तिकिटावरील जीएसटी २८ टक्क्यांवरून१८ टक्क्यांवर अाणला अाहे. 
  • कॉम्प्युटर, टीव्ही (३२ इंच), टायर्स, पॉवर बँक या वस्तूंवर अाधी २८ टक्के जीएसटी होता. अाता हा दर १८ टक्के झाला अाहे.  
  •  सीमेंट आणि अन्य १३ वेगवेगळे ऑटोमोबाइल पार्ट्सवरील २८ टक्के जीएसटी कायम ठेवण्यात अाला अाहे.  या वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के केल्यास सरकारचा ३३ हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला असता.
  • एसी, डिशवॉशरवरील २८ टक्के जीएसटी कायम ठेवला आहे. 
  •  यात्रेकरूंसाठीच्या विशेष विमानात इकॉनॉमी क्लाससाठी ५ टक्के तर बिझनेस क्लाससाठी १२ टक्के जीएसटी लागेल. 
  •  सोलार प्रकल्पावर ५ टक्के जीएसटी असेल. 
  • थर्ड पार्टी इन्श्यूरन्सच्या हप्त्यावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के केला अाहे. 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा