Advertisement

एक्झिट पोलचा ‘असा’ही लाभ, अदानी समूहाच्या संपत्तीत ५ हजार कोटींची वाढ

त्याचं झालं असं की गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलच्या ‘बतावणी’ला सुरूवात झाली. त्यातील बहुतेक जणांनी भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवल्याने अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वाढले आहेत.

एक्झिट पोलचा ‘असा’ही लाभ, अदानी समूहाच्या संपत्तीत ५ हजार कोटींची वाढ
SHARES

सेंटीमेंट्सवर आधारीत कल क्षणभरात बदलण्यात माहीर असलेल्या मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांमध्ये अदानी समूहाच्या संपत्तीत थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल ५ हजार कोटी रुपयांची वाढ केली.

त्याचं झालं असं की गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलच्या ‘बतावणी’ला सुरूवात झाली. त्यातील बहुतेक जणांनी भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवल्याने अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वाढले. एक्झिट पोलने भाजपा सरकारला अंदाजे १०० ते १२० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. तर काँग्रेसला ७० ते ८० जागा मिळतील, असं म्हटलं आहे.



किती टक्के वाढ?

दिवसभरात अदानी समूहाच्या विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स ५.०७ टक्क्यांनी (१०७२.३२ कोटी रु.) वाढून २०१.९० रुपयांवर पोहोचले. त्याचसोबत अदानी इंटरप्रायझेस ४.५७ टक्के (७३६.८७ कोटी रु.), अदानी पाॅवर ४.२३ टक्के (५५९.२६ कोटी रु.) आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकाॅनाॅमिक झोनमध्ये ३.०८ टक्क्यांची (२५२६.५६ कोटी रु.) वाढ झाली. यामुळे अदानी समूहाच्या या ४ कंपन्यांच्या मार्केट कॅपचं एकत्रित मूल्य ४ हजार ८९५ कोटी रुपयांनी वाढलं.


अदानीच का?

अदानी समूहाचे भाजपासोबत चांगले संबंध असल्याचं म्हटलं जातं. भाजपाला पार्टी फंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये अदानीचंही नाव घेतलं जातं. त्यामुळे गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपा निवडून आल्यास कंपनीचं विस्तारवादी धोरण कायम राखलं जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचं प्रमाण वाढलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा