Advertisement

भारत - ब्रिटन विमान वाहतूक सेवा बंद, एअर इंडियाचा निर्णय

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काही देशांनी भारतातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.

भारत - ब्रिटन विमान वाहतूक सेवा बंद, एअर इंडियाचा निर्णय
SHARES

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ  होत आहे. काही देशांनी भारतातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. आता एअर इंडियानेही ब्रिटन विमान सेवा बंद केली आहे. ब्रिटनला जाणाऱ्या आणि ब्रिटनहून येणाऱ्या आपल्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. 

एअर इंडियानं ट्विट करून ही माहिती दिली आहे. २४ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान नवे निर्बंध लागू असणार आहेत. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ‘भारत आणि ब्रिटन यादरम्यान प्रवास करणार असलेल्या प्रवाशांनी नोंद घ्यावी की यूकेकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर यूकेला जाणाऱ्या किंवा यूकेहून येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट्स २४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रक, तिकिटांचा परतावा याबाबतची माहिती लवकरच पोर्टलवर दिली जाईल.

दरम्यान, २४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये दिल्ली आणि मुंबईहून यूकेला जाणारी एक फ्लाईट आठवड्यातून एकदा पाठवण्याचा विचार सुरू असून त्यासंदर्भात लवकरच कळवलं जाईल, असं देखील एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

रेल्वेच्या 'त्या' शूर कर्मचाऱ्याला जावा कंपनीकडून ही खास भेट

मुंबईतील मशिदी कोरोना रुग्णांना पुरवत आहेत मोफत ऑक्सिजन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा