Advertisement

बिग बास्केट, ग्रॉफर्सचं शटर डाऊन, अॅमेझॉनही घेणार नाही ऑर्डर

ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या काही सेवा अस्थायी स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बिग बास्केट, ग्रॉफर्सचं शटर डाऊन, अॅमेझॉनही घेणार नाही ऑर्डर
SHARES

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉक डाऊन करण्यात आलं आहे. त्यामळे अ‍ॅमेझॉनसारख्या अनेक ऑनलाइन कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या काही सेवा अस्थायी स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांसाठी हे थोडं त्रासदायक असतं तरी याची आवश्यक्ता होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी भारतामध्ये २१ दिवसांसाठी लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनंतर अ‍ॅमेझॉननं सध्याच्या परिस्थितीत कमी महत्त्वाच्या प्रोडक्ट्सची अनिश्चित काळासाठी ऑर्डर घेणं बंद केलं आहे. मात्र स्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोडक्ट्सची विक्री त्यांनी सुरू ठेवली आहे.


ग्रोफर्स-बिग बास्केट बंद

एवढच नव्हे तर ग्रोफर्स आणि बिग बास्केट सारख्या शॉपिंग वेबसाइट्सनं सुद्धा त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत. ग्रोफर्सनं त्यांच्या पेजवर ‘Notify Me’चा पर्याय दिला आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा त्यांची सुविधा सुरू होईल त्यावेळी ग्राहकांना नोटिफेकशन पाठवण्यात येईल. त्याचप्रमाणे बिग बास्केटनं त्यांची सेवा फक्त त्यांच्या सध्याच्या ग्राहकांसाठी सुरू ठेवली आहे.


Flipkart ची सर्व्हिस बंद

फ्लिपकार्टनं सुद्धा बुधवारी भारतातील सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. फ्लिपकार्टनं त्यांच्या वेबसाइटवर बॅनर पोस्ट करून लिहिलं आहे की, ‘आम्ही अनिश्चित काळासाठी आमची सेवा बंद केली आहे. आमच्यासाठी तुमच्या गरजा अधिक महत्त्वाच्या आहेत. आम्ही वचन देतो की, आम्ही लवकर परत येऊ. सध्या कठीण काळ सुरू आहे, हे याआधी कधी झालेले नाही. मात्र सुरक्षित राहण्यासाठी एकमेकांपासून वेगळं राहणं आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की घरामध्ये सुरक्षित राहा. आम्ही लवकर परत येऊ आणि एकत्रित येऊन हा परिस्थितीतून बाहेर पडू.’


गुड न्यूज

दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा १००च्या वर गेला आहे. पण महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त रुग्ण अशी नोंद झालेल्या दाम्पत्याला गुरूवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे दाम्पत्य दुबईहून मुंबईवाटे पुण्यात परतले होते. उपचारांदरम्यान घेतलेल्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर डाॅक्टरांनी त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन तसंच टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर रुग्णालयालच्या रुग्णवाहिकेतून त्यांना घरी सोडण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी ही गोड बातमी ठरली आहे. 
हेही वाचा

HDFC, ICICI बॅंकेच्या वेळेत बदल

Corona Effect: डेटॉल- लाइफबॉयमध्ये लागलं भांडण

संबंधित विषय
Advertisement