Advertisement

खूशखबर! आता ‘या’ वेळेत उघडणार बँका

सरकारी नियमानुसार सद्यस्थितीत देशभरातील बहुतेक बँका सकाळी १० वाजता उघडतात आणि त्यापुढं बँकेतील कामकाजाला सुरूवात होते. परंतु लवकरच बँक उघडण्याच्या वेळेत बदल होणार आहे.

खूशखबर! आता ‘या’ वेळेत उघडणार बँका
SHARES

सरकारी नियमानुसार  सद्यस्थितीत देशभरातील बहुतेक बँका सकाळी १० वाजता उघडतात आणि त्यापुढं बँकेतील कामकाजाला सुरूवात होते. परंतु लवकरच बँक उघडण्याच्या वेळेत बदल होणार आहे. कारण बँकांच्या वेळेत बदल करण्याचा प्रस्ताव बँकिंग विभागाने (Banking division) अर्थ मंत्रालयाला (finance ministry) नुकताच सादर केला आहे. या प्रस्तावानुसार बँका सकाळी ९ वाजता उघडण्याची शक्यता आहे.

वेळेचे ३ प्रस्ताव

देशातल्या शहर आणि ग्रामीण विभागातील बँका एकाच वेळेत खुल्या व्हाव्यात यासाठी बँकिंग विभागाने हा प्रस्ताव बनवला आहे. त्याआधी १० जून रोजी बँकिंग विभागाने एक बैठक घेतली होती. या बैठकीत ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यानुसार बँक उघडण्याच्या वेळेचा (Timings) प्रस्ताव तयार करण्यात आला. सोबतच भारतीय बँकिंग असोसिएशनने बँक उघडण्याबाबतचे ३ प्रस्ताव दिले होते.

‘ही’ असेल नवी वेळ

या प्रस्तावानुसार पहिला पर्याय आहे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत. दुसरा पर्याय सकाळी १० ते ४ वाजेपर्यंतचा आणि तिसरा पर्याय सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतचा. अशा ३ प्रस्तावांपैकी ९ ते ३ वेळेची निवड करण्यात आल्याचं समजत आहे. ही नवीन वेळ सप्टेंबर महिन्यापासून लागू होऊ शकते. ही नवी वेळ देशभरातील सर्व बँकांना लागू करण्यात येईल.  



हेही वाचा-

‘या’ बँकांनी कर्जे केली स्वस्त! जाणून घ्या कुणाचे किती दर?

मुंबईतल्या हाॅटेलचा प्रताप, २ अंडी, आॅम्लेटचं बिल ३४०० रुपये!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा